Sankashti Chaturthi 2023 : आज संकष्टी चतुर्थी आहे. आजचा दिवस हा गणपती बाप्पाला समर्पित आहे. हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला खूप महत्त्व आहे. या दिवशी गणपतीला कसे प्रसन्न करावे. त्याचे हे सोपे उपाय जाणून घ्या.
या दिवशी भक्त पूर्ण भक्तीभावाने गणेशाची पूजा करतात तसेच त्याची आराधना करतात. संकष्टी चतुर्थी श्रावण महिन्यात कृष्ण पक्षात येते. हिला गजानन संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते. आज गजानन संकष्टी चतुर्थी व्रत पाळू शकता.
पौर्णिमेनंतर कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात. या चतुर्थीला व्रत आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला साजरे केले जाते.
संकष्टी या शब्दाचा अर्थ कठीण प्रसंगातून सुटका करणे असा आहे.
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाला सिंदूरचा टिळा लावा.
संकष्टी चतुर्थीला शमीच्या झाडाची पूजा करा.
गणपीतला 5 प्रकारची फुले आणि मोदक अर्पण करा.
बाप्पाला 7 वेळा दुर्वा अर्पण करा. ऊँ गं गणपतये नम: या मंत्राचा जप करा.
गणपतीला तूप-गुळ अर्पण करुन गायीला खाऊ घाला.
चार वर्षांच्या मुलाला स्वत:च्या हाताने लाडूचा प्रसाद खायला द्या.
सजवलेले पितांबर किंवा भगवे वस्त्र अर्पण करा. कापूर आरती करावी.
लाल पिशवीत काजू, पूजेत बदाम, बेदाणे, चारोळी, सुपारी, पिस्ता, वेलची, खारीक, अक्रोड, मकाणे आदी पंच मेवे अर्पण करा.