उन्हाळ्याच्या दिवसांत उसाचा रस हमखास प्यायला जातो
उसाचा रस शरीर हायड्रेट ठेवण्याबरोबर अनेक आजारांपासून दूर ठेवतो
उसाच्या रसात कॅल्शियम, मॅग्नीशियम, आयर्न, पॉटेशियमसारखे गुणधर्म असतात
मात्र, काही जणांसाठी उसाचा रस नुकसानदायक ठरु शकतो. त्यामुळं हे आजार असलेल्या लोकांनी उसाचा रस पिणे टाळावे
उसाच्या रसात ग्लायसेमिक इंडेक्स (जीआय) असते. ज्यामुळं मधुमेह रुग्णांची ब्लड शुगर लेव्हलवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळं मधुमेह असलेल्या रुग्णांनी उसाचा रस पिऊ नये
ज्या लोकांच्या दातांमध्ये आधीपासूनच कॅव्हिटिज आहेत त्यांनी उसाचा रस पिणे टाळावे. कारण उसाच्या रसात आधीपासूनच साखर असते ज्यामुळं तोंडातील बॅक्टिरीया वाढू शकतात.
उसाच्या रसात कॅलरी अधिक प्रमाणात असतात. त्यामुळं तुम्ही अधिक प्रमाणात उसाच्या रसाचे सेवन करत असाल तर वजन वाढण्याचा धोका असतो
उसाच्या रसात कॅलरीज आणि साखर दोन्ही असतात. ज्यामुळं शरीरातील फॅट वाढू शकते.
उसाच्या रसात असलेल्या पोलीकोसैनॉलमुळं पाचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळं पोटदुखी, चक्कर येणे, डायरियासारखे आजार होऊ शकते