भाविकांसाठी दिलासादायक बातमी

May 26,2023

देशभरातून येतात भाविक

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ असलेल्या तुळजाभवानी देवीच्या मंदिरात महाराष्ट्रासह देशभरातून मोठ्या संख्येने भाविक देवीदर्शनासाठी येतात

आजपासून विनापास प्रवेश

महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात आजपासून भाविकांना विनापास प्रवेश दिला जाणार आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ सचिन ओम्बासे यांनी हा निर्णय घेतला आहे.

तासनतास उभे राहावं लागत होतं रांगेत

आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी गेल्या दहा वर्षापासून भाविकांना निशुल्क पास दिले जात होते. हे पास मिळवण्यासाठी भाविकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत होते.

आता निशुल्क पास बंद

भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मंदिर संस्थानाने आजपासून मंदिरात दर्शनासाठी देण्यात येणारे निशुल्क पास बंद केले आहेत.

या भाविकांसाठी पास सुरुच

व्हीआयपी व पेड पाच मात्र सुरूच राहणार आहेत. गुरुवारी झालेल्या मंदिर संस्थांनच्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला आहे. मंदिर संस्थांच्या या निर्णयामुळे भाविकांची दर्शनासाठीची परवड थांबणार आहे.

तोकडे कपडे घालण्यावरुन वाद

मंदिरात प्रवेश करताना भाविकांनी असभ्य आणि अशोभणीय कपडे घालण्यास बंदी असल्याचा बोर्ड 18 मे रोजी तुळजाभवानी मंदिर परिसरात लावण्यात आला होता.

कुठलाही ड्रेसकोड लागू नाही

वाद वाढल्यानंतर भाविकांसाठी कुठल्याही स्वरूपाचा ड्रेसकोड लागू नाही, असे मंदिर संस्थानकडून स्पष्टीकरण देण्यात आले होते.

तिरुपती मंदिरात नियमांमध्ये बदल

तिरुपती बालाजी मंदिरात भाविकांना विना टोकन दर्शन मिळणार आहे. शुक्रवार, शनिवार आणि रविवारी असणारा कोटा मंदिर संस्थानाकडून मागे घेण्यात आला आहे.

VIEW ALL

Read Next Story