'झिम्मा'तील लोकप्रिय अभिनेत्री आणि रणवीरच्या चित्रपटात

मागील वर्षी प्रदर्शित झालेला 'झिम्मा' हा मराठी चित्रपट प्रचंड गाजला. चित्रपटगृहात या चित्रपटानं 100 दिवस पुर्ण करत इतिहास घडवला. (Photo: Kshiti Jog | Instagram)

रणवीर सिंगच्या चित्रपटातून दिसणार

आता या चित्रपटाचा दुसरा भागही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. परंतु या लोकप्रिय चित्रपटातील अभिनेत्री आता रणवीर सिंगच्या चित्रपटातून दिसणार आहे. (Photo: Kshiti Jog | Instagram)

'रॉकी और रानी की प्रेम कहानी'चा पोस्टर आऊट

'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपटाचा पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या पोस्टवर मराठमोळी अभिनेत्री झळकली आहे. (Photo: Kshiti Jog | Instagram)

लोकप्रिय अभिनेत्री

ही अभिनेत्री आहे क्षिती जोग. क्षिती ही लोकप्रिय मराठी अभिनेत्री आहे. तिनं हिंदी मालिकांतूनही कामं केली आहे. (Photo: Kshiti Jog | Instagram)

रॉकीच्या कुटुंबातील सदस्य

यावेळी या चित्रपटात ती रणवीर सिंगच्या म्हणजेच रॉकीच्या कुटुंबातील एक सदस्य असते. (Photo: Kshiti Jog | Instagram)

हेमंत ढोमेची पत्नी

क्षिती ही सुप्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी पत्नी आहे. (Photo: Kshiti Jog | Instagram)

घरातूनच वारसा

क्षिती ही ज्येष्ठ अभिनेत्री उज्ज्वला जोग आणि अभिनेते अनंत जोग यांची मुलगी आहे. (Photo: Kshiti Jog | Instagram)

VIEW ALL

Read Next Story