एपीजे अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी विचार वाचून तुमचे आयुष्य बदलू शकते.
स्वप्न ती नाहीत जी आपण झोपल्यावर पाहतो. तर ती आहेत, जी आपल्याला झोपू देत नाहीत.
आयुष्यात आपण कोणाकडून हार नाही मानली पाहिजे. आपल्याला हरवण्याची अनुमती आपण समस्यांना देता कामा नये.
या जगात एखाद्याला हरवणे खूप सोपे आहे. पण एखाद्याला जिंकणे तितकेच कठीण आहे.
पहिल्या विजयानंतर आराम करु नये अन्यथा लोक ते नशिबानं मिळालेलं यश असं मानतील.
सुर्याप्रमाणे तेजस्वी व्हायचे असेल तर त्याप्रमाणे जळायची तयारी हवी.
विज्ञान मानवतेसाठी मोठं गिफ्ट आहे. आपण ते बिघडवता कामा नये.
मी कुठे आहे आणि मला कुठे जायचंय हे माहिती नसणं ही जगातील सर्वात मोठी समस्या आहे.
तुमच्या आशा, स्वप्न आणि लक्ष्य गाडले गेले असेल तर ते शोधा. तुम्हाला खड्ड्यात लपलेली सुवर्ण संधी मिळू शकते.
देशातील सर्वात महान बुद्धीमता शाळेतील शेवटच्या बाकावर सापडू शकते.