पावसाळ्यात डासांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.
डास त्यांच्यासोबत अनेक प्रकारचे रोगजंतू घेऊन येतात.
रोझमेरी ही औषधी वनस्पती आहे यात अॅंटीबायोटीक गुणधर्म असल्याने डास दूर राहतात.
लॅव्हेंडर आणि झेंडूच्या फुलांच्या वासाने डास पळून जातात त्यामुळे खिडकीवर किंवा कंटेनरमध्ये ठेवा.
लिंबूच्या तुकड्यात लवंग टाकून घराच्या कानाकोपऱ्यात ठेवल्याने डास येत नाही
डासांना तुळशीचा वास आवडत नसल्याने त्याचे तेल वापरू शकता.
लेमन ग्रास देखील डासांपासून दूर ठेवण्यास मदत करते.
कडुलिंबाच्या वाळलेल्या पानांचा तेल डासांना शरीरापासून आणि घरापासून दूर ठेवण्यासाठी सर्वात उत्तम उपाय आहे.