फक्त लसूणच नाही तर त्याची सालही आरोग्याला फायदेशीर

Jul 22,2024


लसूण हा आपल्या स्वयंपाकघरातला महत्वाचा भाग आहे.


लसूण हे एक औषधी वनस्पती असून त्याचे अनेक फायदे देखील आहेत.


पण तुम्हाला हे माहित आहे का लसूणसोबतच लसणाच्या सालींचा देखील वापर केला जातो. आपण अनेकदा लसणाची साल फेकून देतो.


लसणाच्या सालीपासून आपण गार्लिक पावडर बनवू शकतो.


लसणाच्या सालीमध्ये अँटी-व्हायरल, अँटी-फंगल आणि अँटी-बॅक्टेरियल असतात ज्यामुळे अन्नातील पोषक तत्त्व वाढण्यास मदत होते.


त्याचबरोबर लसणाच्या सालीमध्ये असलेले अँटी-फंगल गुणधर्म त्वचेसाठी फायदेशीर आहेत.


लसणाची साल केसांसाठी फायदेशीर मानली जाते. यामुळे केसांतील कोंड्याची समस्या दूर होते. तुम्हाला हवं असेल तर लसणाच्या सालीचं पाणी उकळून केसांमध्ये लावू शकता.


दम्याचा त्रास असलेल्या रूग्णांनी साल बारीक करून मधासोबत रोज सेवन केल्यास आजारापासून आराम मिळतो.


लसणाची साल पायांची सूज कमी करते. लसणाच्या साली पाण्यात उकळून त्यात पाय बुडवून ठेवल्यास सूज कमी होण्यास मदत होते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story