हिवाळ्यात कानासंबंधीत समस्या होणे ही खूप सर्वसाधारण गोष्ट आहे. जर वेळी तुम्ही याचा उपचार लगेच केला नाही तर ते खूप गंभीर होऊ शकतं.
हिवाळ्यात त्रास का होतो याविषयी डॉ. अनीश गुप्ता यांनी India.com ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. या वातावरणात बॅक्टेरिया आणि वायरस खूप वाढतात. त्यामुळे कान दुखतो.
अनेकदा फक्त कान इतका दुखतो की सहन शक्तीच्या बाहेर होतं. तर कधी कानातून पाणी येऊ लागतं.
या वेळत कानाला सुज देखील येण्याची शक्यता असते. त्याचं कारण कोरडेपणा असू शकतो.
हिवाळ्यात मुलांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. ठंडीत त्यांच्या कानाला हवा लागली तर ते जास्त ठणकू लागतात.
कानच्या दुखण्यापासून वाचण्यासाठी मास्क लावा किंवा टोपी घाला. तर नाका संबंधीत त्रासापासून सूटका हवी असल्यास त्याची औषध किंवा मग सेलाइन ड्रॉप्सचा उपयोग करा.
(Disclaimer : वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)