हिंदु धर्मात शुभ कार्याप्रसंगी हातात लाल धागा बांधला जातो. यामागे वैज्ञानिक तसेच धार्मिक कारणेदेखील आहेत.
लाल धागा देवीदेवतांना अर्पित करण्यासोबत रक्षासूत्र म्हणून वापरला जातो. याबद्दल ज्योतिषशास्त्रात सांगितलेली माहिती जाणून घेऊया.
लाल धागा मनगटात बांधल्याने त्रिदेव म्हणजेच लक्ष्मी, पार्वती आणि सरस्वतीचा आशीर्वाद राहतो. सर्व कामे विना अडथळा पार पडतात.
लाल धागा आपली रक्षा करतो आणि घरात सुख-समृद्धी नांदते.
ज्या हातात लाल धागा बांधाल, 1 रुपया हातात ठेवून ती मूठ बंद ठेवा. यावेळी दुसरा हात डोक्यावर ठेवा.
ज्योतिषशास्त्रानुसार, मनगटात 3,5 किंवा 7 वेळा लाल धागा गुंडाळायला हवा. त्या हातात असलेली दक्षिणा धागा बांधणाऱ्याला द्यावी.
हातात बांधलेला लाल धागा मंगळवार किंवा शनिवारीच काढावा. त्याजागी देवघरात जाऊन दुसरा धागा बांधावा.
काढलेला लाल धागा पिंपळाच्या झाडाखाली ठेवू शकता किंवा वाहत्या पाण्यात सोडू शकता.
मनगटात बांधलेला लाल धागा एक्युप्रेशर म्हणून काम करतो. यामुळे हृदयासंबंधी आजार, डायबिटीज, लकवा नियंत्रणात राहतो.
(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)