अक्रोड, काजू, बदाम, पिस्ता, मनुके यासारख्या ड्रायफ्रुट्समध्ये अनेक पोषकतत्वे असतात. तसंच, आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असतात
ड्रायफ्रुट्समध्ये मिनरल्स, अँटीऑक्सिडेट्स आणि फायबरसारखे गुणधर्म असतात. तुम्ही मिठाई, लाडू, शेक आणि स्मूदीमध्ये टाकूनही ते खाऊ शकतात.
पाण्यात भिजवून खालेले ड्रायफ्रुट्स आरोग्यासाठी जास्त फायदेशीर असतात. याच्या सेवनाने अनेक फायदे मिळतात.
पाण्यात भिजवून ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने शरीराला अधिक पोषकतत्वे मिळतात. ते पचायलादेखील हलके असतात.
सकाळच्या वेळी भिजवलेले ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने संपूर्ण दिवसाची उर्जा मिळते.
ड्रायफुट्स हे गरम असतात त्यामुळं पाण्यात भिजवून खाल्ल्याने शरीराला अधिक फायदे होतात.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)