रेखा नेहमी कांजीवरम साडी का नेसतात?

एव्हरग्रीन रेखा यांचं सौंदर्य साडीमध्ये अधिक खुलतं. त्या कुठलाही सोहळा असो साडीमध्ये दिसतात.

रेखा यांची कांजीवरम साडी ही स्टाइल पेटंट बनली आहे.

तुम्हाला रेखा यांच्या कांजीवरम साडी नेसण्यामागील कारण माहिती आहे का?

रेखा यांनी स्वत: एका पुस्तकात याबद्दल सांगितल आहे. त्या म्हणाल्या की मला काय विचारलं जात की मी साडी का नेसते?

यावर त्यांनी उत्तर दिलं की, माझा विश्वास आहे की स्टायलिश दिसणे म्हणजे केवळ फॅन्सी कपडे घालणे असा होत नाही. तुमचे पारंपारिक कपडे देखील तुम्हाला स्टायलिश दिसू शकतात.

कांजीवरम साडी हे माझ्या संस्कृतीचा भाग असून माझ्या आई आणि तिच्या प्रेमळ आठवणीचा खजिना आहे.

कांजीवरम साडी नेसल्यावर मला माझी आई सोबत असल्याचा भास होतो आणि मला सुरक्षित वाटतं.

VIEW ALL

Read Next Story