कुत्र्यांनी त्यांच्या मालकांना चाटणे ही एक सामान्य गोष्ट आहे. तुम्हाला हे अनेकवेळा बघायला मिळते.
बहुतेक लोकांना असे वाटते की जर त्यांचा पाळीव कुत्रा त्यांना चाटत असेल तर तो त्यांच्याबद्दल प्रेम, मैत्री आणि आपुलकी दाखवत आहे.
काही प्रमाणात प्रेम व्यक्त करत आहे हे खरे कारण आहेच. पण प्रत्येक वेळी असे घडतेच असे नाही.
विशेषतः जेव्हा कुत्रा तुमच्या शरीराचा एक भाग जास्त चाटत असतो तेव्हा कारण वेगळे असते.
कधीकधी कुत्रे देखील त्यांच्या भावना आणि गरजा व्यक्त करण्यासाठी चाटतात.
जर तुमचा कुत्रा तुमच्या शरीराच्या इतर कोणत्याही भागापेक्षा तुमचा चेहरा चाटण्याचा प्रयत्न करत असेल तर याचा अर्थ असा आहे की त्याला तुमच्याकडून खायला हवे आहे.
याशिवाय पाळीव कुत्रे तुम्हाला चाटतात तेव्हा त्यांच्यामध्ये डोपामाइन आणि एंडॉर्फिन रिलीज होतात. जे त्यांना इतरांशी जोडण्यास मदत करते.
काही संशोधनात असे दिसून आले आहे की जेव्हा आपण स्पष्टपणे नाराज असतो तेव्हा पाळीव कुत्रे आपल्याला अधिक चाटतात.
कुत्रे बहुधा असे करतात जेणेकरून ते आपले मनोबल वाढवू शकतील.