Interesting Facts

अर्जुनाने बहिणीशी लग्न का केलं?

Oct 13,2023


महाभारतातील पात्र आणि कथेबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. महाभारत कथेनुसार अर्जुनाने द्रौपदीनंतर सुभद्राशी लग्न केलं होतं. सुभद्रा ही अर्जुनाची बहीण होती मग हे लग्न कसं झालं. चला याबद्दल जाणून घेऊयात.


महाभारताच्या कथेनुसार अर्जुन हा द्रौपदीपेक्षा सुभद्रावर जास्त प्रेम करत होता, असं म्हटलं जातं.


पण महाभारताच्याच कथेनुसार सुभद्रा ही अर्जुनची बहीण असल्याचं म्हटलं गेलं आहे. हिंदू धर्मात भाऊ बहीण लग्नाला परवानगी नाही.


सुभद्रा ही श्रीकृष्णाची बहीण होती आणि अर्जुन हा मावशी कुंतीचा मुलगा होता. याचा अर्थ अर्जुन आणि सुभद्राही चुलत भाऊ बहीण होते.


असं म्हणतात अर्जुन हा सुभद्राला पाहता क्षणी मोहीत झाला होता. त्याने सुभद्राशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली.


त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की, सुभद्रा ही वासुदेव आणि रोहिणीची मुलगी आहे. यामुळे ती श्रीकृष्णाची सावत्र बहीण झाली.


अर्जुनने सुभद्राच्या स्वयंवरात हा निर्णय जाहीर केल्याने अडचणी निर्माण होऊ शकतात. म्हणून श्रीकृष्णाने अर्जुन आणि सुभद्राला पळून जाण्याचा सल्ला दिला.

VIEW ALL

Read Next Story