सध्या सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ व्हायरल होतोय जिथं लोकं अॅल्युमिनियम फॉईलचे गोळे चक्क वॉशिंग मशिनमध्ये टाकत आहेत. असा दावा केला जात आहे की यामुळं कपडे स्वच्छ धुतले जातात.
या ट्रीकनुसार अॅल्युमिनियम फॉईलचे साधारण लहान चेंडूच्या आकाराचे गोळे तयार करावेत आणि त्यांना कपड्यांसमवेत मशिनमध्ये टाकावं.
हे बॉल मशिनमध्ये फिरताना कापडावर हळुवार घर्षण करतात. ज्यामुळं कपडे नरम होऊन एका रासायनिक प्रक्रियेप्रमाणं इस्त्री केल्यासारखे भासतात.
वॉशिंग मशिन आणि ड्रायरमध्ये कपड्यांचं घर्षण झाल्यामुळं इलेक्ट्रॉनचं स्थानांतरण होतं.
जेव्हा कपडे या फॉईलच्या गोळांच्या संपर्कात येतात तेव्हा तिथं निर्माण झालेली उर्जा संतुलित होते.
ड्रायरमध्ये हे गोळे कपड्यातील चार्ज संपवतात आणि ते इस्त्री न करताही अगदी इस्त्री केल्यासारखे दिसू लागतात. (वरील माहिती उपलब्ध संदर्भांवर आधारित असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही,)