श्रावण महिन्यात शिवलिंगावर रुद्राक्ष अर्पण करणे शुभ मानले जाते.
रुद्र म्हणजे शंकर आणि अक्ष म्हणजे शंकराच्या डोळ्यातील अश्रू, अशी रुद्राक्षाची व्युत्पत्ती आहे.
रुद्राक्षाचे प्रामुख्याने 17 प्रकार आहेत. ज्यामध्ये 12 मुखी रुद्राक्षांचे विशेष महत्त्व आहे.
रुद्राक्ष धारण करणाऱ्यांनी मांस किंवा दारूचे सेवन अजिबात करु नये.
त्यासोबतच रुद्राक्ष धारण करणाऱ्यांनी आपले आचरण शुद्ध ठेवावे. अन्यथा रुद्राक्षाचे परिणाम विपरीत असू शकतात.
संसारसुखाची अपेक्षा करणाऱ्यांनी रुद्राक्ष धारण करू नये. कारण, ते विरक्तीचे प्रतीक आहे.