ठिकरीची फोडणीः वरणाला दगडाची फोडणी; वाचा रेसिपी

वरणाला दगडाची फोडणी देणे, हा प्रकार तुम्ही कधी ऐकलाय का? आज आम्ही तुम्हाला याचे फायदे सांगणार आहोत.

वरणाला दगडाची फोडणी देण्याच्या या पद्धतीला महाराष्ट्रात ठिकरीची फोडणी असं म्हणतात.

ठिकरीची फोडणी कशी द्यायची हे जाणून घेऊयात.

सर्वप्रथम डाळ चांगली शिजवून घ्यावी. त्यानंतर फोडणीची तयारी करावी.

फोडणीच्या भांड्यात एक स्वच्छ दगड घ्या त्यावर ठेचलेला लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर टाका

हे सर्व साहित्य गरम करुन घ्या आणि मग यावर तेल घाला. नेहमी वापरता त्यापेक्षा अर्धे तेल वापरा.

आता ही फोडणी गरम झाल्यावर डाळीत मिसळा. भातासोबत हे वरण खूप छान लागते.

मात्र, ही फोडणी देत असताना दगड निवडताना खूप सावधगिरी बाळगणे गरजेचे असते. त्यावरील धूळ नीट काढून व्यवस्थित स्वच्छ करावा. मगच वापरावा

VIEW ALL

Read Next Story