भारतातील नागरिक गोड खाण्याचे शौकिन आहे. महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाया मिळतात.
माहिम हलवा ही मिठाई आता जगप्रसिद्ध झाली आहे. हिचे नाव मुंबईतील माहिम या ठिकाणावरुन पडलंय.
माहीम येथील मिठाईवाले जोशी बुधाकाका यांनी तयार केल्यामुळे हे नाव देण्यात आले आहे
मैदा, दूध, साखर, तूप, फूड कलर, सुका मेवा, वेलची पावडर
सगळ्यात आधी एका भांड्यात तूप घेऊन त्यात मैदा घालून चांगला भाजून घ्या.
त्यानंतर दुसऱ्या एका भांड्यात साखरेचा पाक तयार करुन घ्या. पाकात फुड कलर घालून एकदा चांगलं एकजीव करुन घ्या.
आता मैदा चांगला भाजून झाल्यानंतर त्यात पाक घालून एकजीव करुन घ्या. कणकेच्या पीठासारखं मिश्रण होईपर्यंत एकजीव करुन घ्या.
हात ओला करुन हे मिश्रण मळून घ्या. बटर पेपरवर ठेवून लाटून घ्या. त्यावर सुकामेवा टाकून सजवून घ्या.
एकदा हलवा लाटून घेतल्यानंतर तो पाच मिनिटे सुकवून घ्या. आता परफेक्ट माहिमचा हलवा तयार आहे.