रवीना टंडनची मुलगी राशा थडानी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी आता सज्ज झाली आहे.
रवीनाने लेकीला खास सल्ला दिलाय. रवीना टंडन वाटत नाही की आपल्या मुलीने करियरच्या सुरूवातीलाच कोणाच्या तरी प्रेमात पडावं.
आपल्या मुलीने सध्या करियरवर फोकस करावा, त्याचबरोबर तिने अभ्यासावर देखील लक्ष दिलं पाहिजे, असं मत रवीनाने मांडलं आहे.
एका व्यक्तीला आयुष्यात थोडं प्रॅक्टिकल होण्याची गरज आहे. करियरवर फोकस करण्याची गरज आहे. आता इतर गोष्टींना वेळ देण्यात अर्थ नाही, असं रवीना म्हणते.
कोणत्याही नात्यात जबदस्ती योग्य नसते. योग्य पार्टनर मिळण्यासाठी अनेक लोकांना भेटणं गरजेचं असतं, असंही रवीना टंडनने म्हटलं आहे.
आजकालच्या मुलींना वाटतं की लग्न करणं म्हणजे मजा असते. पण योग्य वेळी योग्य मुलगा निवडणं गरजेचं असतं, असं मत देखील तिने नोंदवलं.
लग्न म्हणजे मस्करी नाही. लॉग टर्म कमिटमेंट असते. थोडा विचार करून तुम्ही निर्णय घेतला पाहिजे, असंही रवीनाने म्हटलं आहे.
मला वाटतं की तिने माझ्या चुकांमधून काहीतरी शिकलं पाहिजे, स्वत:च्या चुकांमधून शिकलं पाहिजे, असं रवीनाने म्हटलंय.