स्टुडिओ अपार्टमेंट म्हणजे काय?

Jun 17,2024

स्टुडिओ अपार्टमेंट

पाश्चिमात्य देशांप्रमाणं भारतातही स्टुडिओ अपार्टमेंटची संकल्पना अतिशय झपाट्यानं लोकप्रिय होताना दिसत आहे.

लहान कुटुंब

सहसा लहान कुटुंब असणारी किंवा एकटे राहणारे अनेकजण स्टुडिओ अपार्टमेंटमध्ये राहण्याला प्राधान्य देतात.

सर्व सुविधा

सोप्या भाषेत समजावं, तर स्टुडिओ अपार्टमेंटमध्ये एकाच ठिकाणी घरातील सर्व सुविधा असतात. थोडक्यात सांगावं तर, ही अद्ययावत सुविधा असणारी चाळीतली खोलीच म्हणा.

लहानसं किचन

एका मोठ्याशा हॉलमध्येच एका बाजूला बेड असतो, एका कोपऱ्यात लहानसं किचन अर्थात स्वयंपाकघर असतं. एकिकडे वाचनाची व्यवस्था असणारा टेबलही असतो.

घराचा प्रत्येक कोपरा

स्टुडिओ अपार्टमेंटमध्ये घराचा प्रत्येक कोपरा तुमच्या डोळ्यांसमोर असतो आणि अनेकांना तो सावरणंही सोपं जातं.

मुंबई

दिल्ली, नोएडा, मुंबई, गुडगाव आणि बंगळुरूमध्ये असे अनेक स्टुडिओ अपार्टमेंट विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

किफायतशीर

विजेचा कमी वापर, घर सावरण्यातील अडथळे कमी, खर्च कमी अशा अनेक सकारात्मक बाजू असल्यामुळं अनेक मंडळी स्टुडिओ अपार्टमेंटला पसंती देतात.

VIEW ALL

Read Next Story