काय असतं Mom Guilt? अशी करा मात, आईपण अधिक चांगलं अनुभवाल

अनेक महिला याच्या शिकार

तुम्ही वाचून हैराण व्हाल, पण अनेक महिलांना प्रसूतीनंतर 'मॉम गिल्ट' या समस्येशी झुंजत असतात.

कधी होतं मॉम गिल्ट?

बाळाच्या जन्मानंतर जॉब जॉईन करणे, मुलाला वेळ देता न येणे, मुलावर ओरडणे अथवा हात उचलणे यामुळे आईमध्ये अपराधाची भावना येते.

जाणून घ्या कारण

स्वतःला अधिक महत्त्व देणे आणि समाज किंवा कुटुंबाच्या अपेक्षा पूर्ण न करता येणे यामुळे मॉम गिल्ट वाढू शकतं.

स्वतःला बाहेर काढा

मॉम गिल्टमधून बाहेर पडणे अत्यंत गरजेचे असते. अन्यथा तुम्ही डिप्रेशन सारख्या गुंतागुंतीच्या गोष्टीत अडकू शकता.

हाताळण्याची पद्धत

सोशल मीडियापासून लांब राहणे, कुणाकडून मदत घेताना घाबरू नये आणि निगेटिव्ह विचारांपासून दूर राहिल्यास मॉम गिल्ट ही परिस्थिती सांभाळू शकता.

स्वतःसाठी वेळ काढा

मॉम गिल्ट दूर करण्यासाठी स्वतःला थोडा वेळ द्या. आपल्या गरजा ओळखून तसे वागणे गरजेचे असते.

तुलना करु नका

मॉम गिल्ट हँडल करण्यासाठी आपली किंवा आपल्या मुलाची कुणाशी तुलना करु नका

योगाचा आधार

स्वतःला संतुलित ठेवण्यासाठी योगाचा आधार घ्या. रुटीनमध्ये नक्की फॉलो करा.

डॉक्टरांशी बोला

गरज असल्यास मनोचिकित्सक किंवा डॉक्टरांशी संपर्क साधा.

VIEW ALL

Read Next Story