आजकाल आपण अनेक स्मार्टफोनवर पाहतो की त्यावर अॅन्टी रेडिएशन स्टिकर हे लावलेलं असतं. तर ते स्टिकर हे दावा करत असतं की हा फोन रेडियशन होऊ देत नाही.
आता हे स्टिकर ज्या फोनला असेल तो फोन वापरण्यासाठी सुरक्षित असल्याचं म्हटलं जातं.
या स्टिकरची किंमत 100 रुपयापासून सुरु होते ती हजारोंमध्ये देखील मिळते.
या स्टिकर विषयी कळण्यासाठी त्याला फोनच्या मागच्या बाजुला चिपकवणं गरजेचं असतं. तर यामुळे डोकं दुखी, झोपेच्या समस्या दूर होतात असं म्हटलं जातं.
या स्टिकरमध्ये असं काही खास नाही... त्याचं कारण त्याचे लूक्स आहेत. कारण हा स्टिकर पाहिल्यानंतर तुम्हाला तो नॉर्मल स्टिकर वाटू शकतो.
हे स्टिकर ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.
दरम्यान, यामुळे खरंच रेडिएशन कमी होतं की नाही याची कोणतीही खात्री नाही. (Disclaimer : वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)