दुचाकी वाहन चालाकांसाठी हेल्मेटचा वापर अतिशय महत्त्वाचा आहे.
वाढत्या अपघातांमुळे देशभरातील विविध राज्यात वाहतुकीसंदर्भातील कठोर नियम लागु करण्यात आले आहेत.
अपघातांदरम्यान डोक्याला जास्त इजा होऊ नये यासाठी हेल्मेटसक्तीसुद्धा करण्यात आली आहे.
हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई केली जाते.
हेल्मेट हा मुळात एक इंग्रजी शब्द असून, त्याला हिंदी आणि मराठीत काय म्हणतात माहितीये?
शब्द जरा कठीण आहे, पण हेल्मेटला हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये 'शिरस्राण' असं म्हणतात.