मासिक पाळी चुकल्यावर किती दिवसांनी कळतं तुम्ही Pregnant आहात की नाही?
आपण गर्भवती आहोत की नाही हे जाणून घ्यासाठी बाजारात अनेक प्रेग्नंसी टेस्ट किट्स मिळतात. पण मासिक पाळी चुकल्यानंतर किती दिवसांनी ही टेस्ट करावी तुम्हाला माहितीये का?
मासिक पाळी चुकली की पहिली शंका येते ती म्हणजे आपण गर्भवती तर नाही ना? त्यासोबत आपलं शरीर काही संकेतही देत असतात.
आपण गर्भवती आहोत हे गर्भधारण्या झाल्यानंतर साधारणत: एक ते दोन आठवड्याने शरीर आपल्याला संकेत देतो.
मासिक पाळी चुकून एक ते दोन आठवडे झाले असेल तर तुम्ही गर्भवती असू शकता.
साधारणतः गर्भधारणा झाल्यानंतर 10 ते 14 दिवसांनी तुमच्या शरीरात लक्षणं दिसतात.
मासिक पाळी चुकल्यासोबतच थकवा, मळमळ आणि ताप यासारखी साधारण लक्षणं दिसतात.
ही लक्षणे सामान्यतः गर्भधारणेच्या 1 ते 2 आठवड्यांनंतर दिसू लागतात.
तसंच काही महिलांच्या स्तनांमध्ये संवेदनशीलता किंवा सौम्य वेदना जाणवतात.
तर काही महिलांना वारंवार लघवी होण्याची समस्या होते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)