केळीच्या पानावर जेवण का वाढतात? हा प्रश्न तुमच्या मनामध्ये नक्कीच आला असेल. पण या पानामध्ये जेवणं ही फक्त एक परंपरा नसून त्यामागील कारण हे उत्तम आरोग्यदेखील आहे.
दक्षिण भारतामध्ये केळीच्या पानावर जेवण्याची पारंपारिक प्रथा आहे. खास करून ओनम सारख्या सणांचा दिवशी जेवण वाढण्यासाठी केळीच्या पानांचा वापर मोठ्या प्रमाणात करतात.
आयुर्वेद डॉ. शरद कुलकर्णी यांच्या म्हणण्यानुसार केळीच्या पानामध्ये औषधी गुणधर्म असतात. त्याला पॉलिफेनोल्स, एपिगॅलोकॅटेचिन गॅलेट किंवा ईजीसीजी देखील म्हटलं जातं. केळीच्या पानात जेवल्याने आरोग्यविषयक अनेक लाभ होतात.
पॉलिफेनोल्समुळे तुम्ही शरीरातील फ्रि रेडिकल्सपासून दूर राहू शकता. ज्यामुळे आजारांपासून संरक्षण होते. त्याचबरोबर केळीच्या पानामध्ये अँटिबॅक्टेरीयल गुण असतात.
केळीच्या पानात जेवणं हे पर्यावरणदृष्ट्याही सुरक्षित आहे. कारण केळींच्या पानांच विघटन लवकर होते.
याशिवाय केळीच्या पानात जेवल्याने केस चांगले राहतात. केळीच्या पानात जे गुणधर्म असतात त्यामुळे शरीरावरील फोड आणि गाठी यापासून आपलं संरक्षण होतं. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)