प्रेमी 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन वीक रोज डे म्हणून साजरा करतील.
फेब्रुवारी महिन्यात 14 तारखेला व्हॅलेंटाइन्स डे असतो. त्या निमित्ताने लाल गुलाबाच्या फुलांना भरपूर मागणी येते.
त्याचं कारण लाल रंगाची गुलाबाची फुलं प्रेमाचं प्रतीक समजली जातात. प्रेम व्यक्त करण्यासाठी लाल गुलाबच का दिले जातात?
प्रेम व्यक्त करण्यासाठी लाल गुलाबाचं फूल देण्याची प्रथा खूप जुनी आहे. ग्रीक धर्मामध्ये लाल गुलाबाचा अफ्रोडाइट या प्रेमाच्या देवतेशी संबंध जोडला जातो.
रोमन आणि ग्रीक लोकांमध्ये अफ्रोडाइट ही प्रेम आणि सौंदर्याची देवता समजली जाते. काही रोमन नागरिक या देवतेला प्रजननाची देवताही मानतात.
गुलाबाचं फूल दिल्यामुळे एकमेकांमधली जवळीक वाढते असंही काही जण समजतात. लाल गुलाब आणि उत्कट भावना यांचा कायम संबंध जोडला जातो.
त्याच उत्कट भावनेतून लाल गुलाब देऊन समोरच्याला आपल्या मनातलं प्रेम सांगितलं जाण्याची पद्धत पडली असावी.
लाल गुलाब केवळ एकदाच नाही, तर कधीही प्रेम व्यक्त करताना दिला जातो. कायम लाल गुलाब दिल्यामुळे प्रेम वाढतं आणि नातं मजबूत होतं, असं म्हणतात.
लाल गुलाबाचं फूल आपल्या मनातल्या भावना समोरच्याला सांगण्यासाठीचा एक मार्ग असतो. हे फूल निर्मळता, निरागसता आणि प्रेमाचं प्रतीक असतं.
एकंदरीत लाल गुलाबाच्या फुलाचा प्रेम आणि प्रेमी युगुलांशी खूप जवळचा संबंध आहे.