व्हॉट्सअॅपवर 'ऑफ' करा हे सेटिंग, समोरच्याला कळूही न देता वाचू शकता मेसेज
व्हॉट्सअॅप हे जगभरात सर्वात जास्त वापरले जाणारे अॅप आहे. त्वरित संवाद साधण्यासाठी याचा वापर केला जातो. या अॅपमधे आपल्याला भरपूर फीचर्स दिसतात.
व्हॉट्सअॅपमध्ये अनेक फिचर्स असले तरी कमी लोकांना व्हॉट्सअॅपचे सर्व फीचर्स माहीत आहेत. कंपनीने 'रीड रीसिप्टस्' असे एक फीचर दिले आहे या फीचरमध्ये बऱ्याच सोयी आहेत.
हे फीचर बंद केल्याने तुम्ही तुम्हाला आलेले मेसेज पाहिलेत तरी पाठवणाऱ्याला कळणार नाही, कारण ब्ल्यू डबल टीक दिसणार नाही.
जर तुम्ही कोणाचं व्हॉट्सअॅप स्टेटस बघितलंत तरी त्यांना कळणार नाही.
सगळ्यात आधी व्हॉट्स अपच्या सेटिंग्समध्ये जा. सेटिंग्समध्ये तुम्हाला बरेच पर्याय दिसतील , त्यातील प्रायव्हसी हा पर्याय निवडा. प्रायव्हसीमध्ये रीड रीसिप्टस् हा पर्याय निवडा आणि तो पर्याय बंद करा.
रीड रीसिप्टस् हा पर्याय बंद केल्यानंतर तुम्हाला तुम्ही पाठवलेले संदेश कोणी वाचले तर ते कळणार नाही. पण यावेळी तुमचा व्हॉट्सअॅप स्टेटस कोणी बघितला हेसुद्धा तुम्हाला जाणून घेता येणार नाही. ब्ल्यू डबल टीक दिसली नाही तरी, डबल टीक दिसेल, पाठवणाऱ्याला तुम्हाला संदेश मिळला हे कळेल.