5 गोष्टीचीं पुस्तके, जी तुम्हाला घेऊन जातील बालपणात!
लहान मुलांसाठी बोधकथा ऐकणे फार गरजेचे आहे,अशा गोष्टी लहान मुलांना रंजक वाटतात आणि चांगली शिकवण देतात, ही कालबाह्य होत चाललेली पुस्तके तुमच्या लक्षात आहेत का?
1968 मध्ये चंपक हे पुस्तक प्रथम प्रकाशित झाले, इंग्रजी सकट 7 भारतीय भाषांमध्ये चंपक उपलब्ध आहे. भारतात चंपक हे फार लोकप्रिय आहे.
1991 साली चारूहास पंडित यांनी चिंटू लिहायला सूरवात केली. सकाळ वृत्तपत्रात त्याची चौकट असायची ,बघता-बघता चिंटू फार लोकप्रिय झाला. नंतर या छोट्या चौकटीचं रूपांतर पुस्तकात झाले.
ज्ञानप्रबोधिनीने कुमारांची कृतिशीलता जोपासणारे मासिक या भुमिकेतून छात्रप्रबोधन हे मासिक सूरू केले होते बोध,विनोद,कविता,आदींचा समावेश या मासिकात होता.
पंचतंत्रात संस्कृत आणि पाली भाषेतील प्राण्यांच्या बोधकथांचे भाषांतर आहे, या गोष्टी फारच रंजक असल्याने लहान-मोठ्या सगळ्यांनाच आवडतात.
अकबरच्या दरबारातला बिरबलचा हजरजबाबीपण आणि चातुर्याचे किस्से सांगणाऱ्या गोष्टी या पुस्तकांमध्ये असायच्या. बऱ्याच प्रकाशन घरांनी अकबर आणि बिरबलच्या गोष्टींची पुस्तके प्रकाशित केली.