जुनं ते सोनं हे म्हणतात ते काही खोटं नाही. मातीच्या भांड्यानी पुन्हा एकदा किचनमध्ये जागा घेतली आहे.
मातीची भांडी आरोग्यवर्धक असल्याने अनेक जण पुन्हा मातीच्या भांड्यांकडे वळले आहेत. वाचा मातीच्या भांड्यांचे फायदे
मातीच्या भांड्यात सच्छिद्रपणा असतो त्यामुळं अन्न चहूबाजूंनी नीट शिजते व खाद्यपदार्थ चविष्ट होतो.
मातीच्या भांड्यात अन्न हळहळू शिजते पण पदार्थांमधील पौष्टिकता तशीच राहते.
मातीच्या भांड्यात स्वयंपाक केल्याने लोह, फॉस्फोरस, कॅल्शियम, मॅग्निशियम सारखी खनिजे मिळतात.
मातीच्या भांड्यात स्वयंपाक केल्यास अन्नाची PH पातळी संतुलित राहते आणि अन्न आरोग्यदायी बनते
मातीच्या भांड्यात अन्न शिजवताना तेल कमी लागते कारण अन्नातील नैसर्गिक तेल टिकवून ठेवते. त्यामुळं ते अन्न हृदयासाठी सर्वोत्तम आहे.