माहिची बहिणी बोहल्यावर..नवरदेवाचे धोनीशी आहे खास कनेक्शन

भारतीय क्रिकेट संघाचे यशस्वी कर्णधार म्हणून महेंद्रसिंह धोनीची जगभरात ओळख आहे. विविध गोष्टींमुळे धोनी नेहमीच चर्चेत असतो.

धोनी आणि त्याची पत्नी साक्षी यांची प्रेमकथा यांच्या आयुष्यावर आलेल्या चित्रपटाच्या माध्यमाधून पाहिली आहे. आत्ता त्याच्या बहिणीच्या लग्नाची सर्वत्र चर्चा रंगू लागली आहे.

एमएस धोनीपेक्षा तीन ते चार वर्षांनी वयाने मोठी असलेली बहिण जयंती गुप्ता एका पब्लिक स्कूलमध्ये शिक्षिका आहे.

विशेष बाब म्हणजे जयंती हिने धोनीचा मित्र गौतम गुप्ता सोबत लग्न केलं आहे.

धोनीच्या क्रीकेटच्या करिअरमध्ये मोठी बहिण आणि मित्र या दोघांनीही महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

धोनीच्या वडीलांचा क्रिकेट खेळण्यासाठी विरोध होता.अशावेळी धोनीच्या बहिणीने त्याला क्रिकेट खेळण्यास प्रेरीत करीत त्यास मदत करत होती.

धोनीचा मित्र गौतम गुप्ता याने देखील क्रिकेट मध्ये करिअर करण्यासाठी सहकार्य केलं होतं.

VIEW ALL

Read Next Story