टोमॅटोचे दर कडाडले आहेत, अशावेळी भाजीत आंबटपणा येण्यासाठी वापरा हे पदार्थ
टोमॅटोची ग्रेव्हीऐवजी तुम्ही भोपळ्याची ग्रेव्हीही करु शकता. पिकलेल्या भोपळ्याच्या ग्रेव्हीमध्ये व्हिनेगर मिक्स केल्यास टोमॅटोच्या प्युरीसारखी चव लागते
लाल रंगासाठी तुम्ही टोमॅटोऐवजी गाजराचा वापरही करु शकता. गाजर किसून ग्रेव्हीत टाकल्यास छान रंग येतो
लाल ढोबळी मिरची किसून किंवा पातळ पेस्ट करुन घातल्यास ग्रेव्हीला छान रंग येतो
भाजीला आंबटपणा यावा यासाठी भाजीत चिंचेचा कोळ घालू शकता. ग्रेव्हीला आंबट-गोडपणा प्राप्त होतो.
ग्रेव्हीला रंग येण्यासाठी बीटाचा वापरही तुम्ही करु शकता. दह्यात मिसळून बीट वापरल्यास उग्र वास कमी होतो