गुढी पाडव्याला गुढी उभारताना तांब्या वापरला जातो. हा तांब्या शक्यतो चांदीचा किंवा तांब्याचा घेतात.
मात्र सतत वापरुन ही भांडी काळी पडतात. अशावेळी या दोन पदार्थांचा वापर करुन लख्ख चमकवा तांब्या-पितळेची भांडी
सायट्रिक अॅसिडची पावडर व मीठाने ही भांडी घासल्यास ती एकदम नव्यासारखी चमकतात
सर्वप्रथम दोन चमचे सायट्रिक अॅसिड घ्या. नंतर त्यात दोन चमचे मीठ मिसळा. या मिश्रणात थोडे पाणी घालून चांगलं एकजीव करुन घ्या
आता हे मिश्रण भांड्याना लावून ठेवून द्या. काहीवेळाने स्पंज किंवा काथ्याने भांडी स्वच्छ करा
नंतर स्वच्छ पाण्याने भांडी धुवून घ्या. आता भांडी एकदम नव्यासारखी चमकतील