योनीत काही हेल्दी बॅक्टेरिया असणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी लसूण खूप महत्त्वाचं ठरू शकतं. त्यात असलेले अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांमुळे यीस्ट इंफेक्शन होण्याची शक्यता ही खूप कमी असते.
संतरं, लिंबू आणि आंबट फळं यात व्हिटामिन सी मोठ्या प्रमाणात असतात. तर या सगळ्या फळांचे सेवन करणं खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे शरीरात कोलेजन बनतं आणि हे योनीचं टिश्यूंना ताकद देतात.
महिलांनी नियमितपणे प्रोबायोटिक पदार्थ जसे की दही, किमची आणि इतर आंबवलेले पदार्थ खावेत. यामुळे योनीतील सूक्ष्म जीवांचे संतुलन राहते.
रताळ्यामध्ये बीटा-कॅरोटीनचे प्रमाण चांगले असते, जे शरीरात गेल्यानंतर व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतरित होते आणि त्याचे फायदे प्रदान करते.
फक्त रताळेच नाही तर सगळ्या भाज्या ज्यांना मुळं आहेत ते महिलांच्या गुप्तांगाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहेत.
दरम्यान, तुम्हाला काही समस्या भासत असल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.) (All Photo Credit : Freepik)