असा एक देश आहे जिथे शॉपिंग करण्यासाठी पैसे देत असेल. तर चला जाणून घेऊया कोणता आहे तो देश...
थायलंडचं सरकार 'डिजिटल वॉलेट' नावाची योजना सुरु करणार आहे. या स्कीमच्या अंतर्गत रजिस्ट्रेशन केल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला 23000 रुपये मिळणार आहेत.
लक्षवेधी गोष्ट म्हणजे सरकार हे पैसे त्या लोकांना लोकल प्रोडक्ट्स खरेदी करण्यासाठी देत आहे. सरकार हे पैसे देखील परत घेत नाही.
लोकांना फक्त पैसे खर्च करण्यासाठी सरकार पैसे देत नसून अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी हे सगळं करत आहे. थायलॅन्डचे अर्थ उपमंत्री यांनी सांगितलं की जवळपास 450 अरब पेक्षा जास्त खर्च येईल.
थायलंडचे पंतप्रधान श्रेथा थाविसिन यांनी सांगितलं की या योजनेसाठी रजिस्ट्रेशन हे 1 ऑगस्टपासून सुरु होतील.
त्यासोबत पहिल्या टप्प्यात 50 लाख नागरिकांना पैसे देण्यात येतील.