बुर्ज खलिफाही मागे पडेल, 'ही' आहेत जगातील 6 महागडी हॉटेल्स

फोर सीझन्स हॉटेल, यूएसए

न्यूयॉर्कमध्ये असलेलं हे हॉटेल उभारण्यासाठी जवळ जवळ सात वर्षे लागली. इथलं एका रात्रीचं भाडं हे तब्बल 36 लाख रुपये आहे. येथे लोकांना अमर्यादित शॅम्पेन आणि मसाजची सुविधा देण्यात येते.

द रॉयल व्हिला, ग्रीस

ग्रीसमधील या आलिशान हॉटेलमध्ये राहण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. येथे राहणाऱ्या पाहुण्यांना प्रायव्हेट जेटमधून फिरवले जाते. इथे एका दिवसाचं भाडं 30 लाख रुपयं आहे.

राज पॅलेस हॉटेल, जयपूर

राजस्थानच्या जयपूरमध्ये असलेलं हे हॉटेल भारतातील महागड्या हॉटेलपैकी एक आहे. हॉटेलमधील फर्निचर सोने, चांदी आणि आयवरीनं बनवलेलं आहे. एका रात्रीचं भाडं 29 लाख रुपये आहे.

हॉटेल मार्टिनेझ, फ्रान्स

फ्रान्समधील या हॉटेलमध्ये एक रात्र राहण्यासाठी 26 लाख रुपये मोजावे लागतील. हॉटेलचे 290 स्क्वेअर मीटर टेरेस, खाजगी बटलर, तुर्की बाथ, ऑन कॉल कार, आर्ट डिकोनं इंस्पायर्ड इंटीरियर आहे.

अटलांटिस द रॉयल, दुबई

Atlantis The royal हे जगातील सर्वात महागडे हॉटेल आहे, जिथे एका रात्रीचे भाडे 100,000 US डॉलर (सुमारे 83 लाख रुपये) आहे.

पॅलेस हॉटेल, सॅन फ्रान्सिस्को

हे अमेरिकेतील दुसरे सर्वात महागडे हॉटेल आहे, ज्याचे एका रात्रीचे भाडे 30 लाख रुपये आहे. येथे तुम्हाला सर्व प्रकारच्या सुविधा मिळतील.

बुर्ज खलिफा, दुबई

जगातील सर्वात उंच इमारतीमध्ये असलेले हे हॉटेल आहे. तर, या हॉटेलमध्ये एका रात्रीसाठी सुमारे 25 लाख रुपये मोजावे लागतील.

VIEW ALL

Read Next Story