चिकन-मटनच नाही तर 'या' पदार्थांमधून मिळतं भरपूर प्रोटीन

काय आहेत गैरसमज?

प्रोटीन हे पोट भरलेलं ठेवते, चयापचय वाढवते आणि स्नायूंच्या बळकटीसाठी योगदान देते. मात्र केवळ मांसहार हेच प्रोटिन्सच उत्तम सोर्स आहे असा गैरसमज पसरवला जातो, आज आपण मांसाहाराला पर्याय असलेले अन् प्रोटिन्सचे उत्तम सोर्स असलेले काही पदार्थ जाणून घेणार आहोत.

राजगिरा

पौष्टिकतेमुळे राजगिरा आरोग्यदायी फायदेकारक मानला जातो. यामध्ये सर्व नऊ अत्यावश्यक अमीनो अॅसिड, फॉस्फरस, लोह, मॅंगनीज असतात आणि चयापचय वाढवताना स्नायूंच्या विकासात मदत होते.

गहू

प्रोटीनसाठी गहू ही पहिली पसंती नसली तरी प्रोटीन, फायबर आणि लोहचा तो चांगला स्रोत आहे. हजारो वर्षांपासून भारतीय संस्कृतीत हा एक प्रमुख स्थान आहे.

ओट्स

प्रथिनेयुक्त नाश्त्यासाठी ओट्स हा एक बहुमुखी पर्याय आहे. ते केवळ प्रोटीन्स नव्हे तर फायबर आणि इतर आवश्यक पोषक तत्त्वे देखील देतात. मधुमेहाच्या रुग्णांसाठीही ओट्स हा योग्य पर्याय असू शकतो.

बकव्हीट (कुट्टू)

USDA च्या मते, सूप, बर्गर, सॅलड किंवा स्नॅक्समध्ये बकव्हीटचा समावेश केला जाऊ शकतो. हे धान्य उच्च-गुणवत्तेचे प्रथिने समृद्ध आहे, ज्यामुळे ते शाकाहारी लोकांसाठी एक उत्कृष्ट पर्याय आहे. हे सर्व आठ अत्यावश्यक अमीनो ऍसिड प्रदान करते.

कुसकुस

कुस्कस हे प्रथिनांनी भरलेले आणखी एक धान्य आहे. हे रव्यासारखेच तयार केले जाऊ शकते आणि क्विनोआ किंवा तपकिरी तांदळाला पर्याय म्हणून वापरले जाऊ शकते. 100 ग्रॅम कुसकुस खाल्ल्याने सुमारे 12.8 ग्रॅम प्रथिने मिळतात.

(All Photo Credit : Freepik) (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story