ओरहान अवात्रामणी अर्थात ओरी सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. नुकताच तो मनीष मल्होत्राच्या पार्टीत सहभागी झाला होता. याचे काही फोटो त्याने शेअर केले आहेत.

बॉलिवूड स्टारकिड्सचा फेव्हरेट असेलला ओरी भाईजान सलमान खानचाही फेव्हरेट आहे. दिवाळीत पार्टीत त्याने सलमान खान बरोबर खास पोझही दिल्या.

एका फोटोत ओरी अभिनेता वरुण धवनबरोबर पोझ देताना दिसतोय. अभिनेत्यांबरोबरही त्याचं चांगलं बॉण्डिंग आहे.

अभिनेता आयुष्मान खुरानाचाही त्याने या पार्टीत भेट घेतली आणि त्याच्याबरोबर फोटोही काढले

या पार्टीत आदित्य रॉय कपूरही सहभागी झाला होता. आदित्यने ब्लॅक कुरता परिधान केला होता. ओरीने त्याच्याबरोबरही फोटोसेशन केलं.

एका फोटोत तो अभिनेत्री रिया चक्रवर्ती बरोबर दिसतोय. रियाने ट्रेडिशनल कपडे परिधान केले होते.

ओरी आणि अनन्या पांडे एकमेकांचे चांगले मित्र आहेत. दोघंही अनेक पार्टीत एकत्र दिसतात. दिवाळी पार्टीतही त्यांनी भरपूर फोटो काढले

केवळ अनन्या पांडेच नाही तर तिची बेस्ट फ्रेंड सारा अली खान हिच्याबरोबरही ओरीने भरपूर पोझ दिल्या.

VIEW ALL

Read Next Story