जगातील लाखो लोक गुगल मॅप या नेव्हिगेशन ॲपचा वापर करतात.
हे ॲप गुगलने तयार केले असून ते स्मार्टफोनमध्ये आधीपासूनच इन्स्टॉल केलेले असते.
या ॲपद्वारे एखाद्या अनोळख्या ठिकाणी जाण्यासाठी मदत होते.
याचा फायदा केवळ एवढ्यापुरतेच मर्यादित नाहीत तर हा ॲप तुमचे पैसे देखील वाचवू शकतो.
आधी तुमच्या स्मार्टफोनवर गुगल मॅप ॲप्लिकेशन ओपन करा.
यानंतर तुमचे स्टार्टिंग पॉइंट आणि डेस्टिनेशन पॉइंट ॲड करा.
स्क्रीनच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या तीन बिंदूंवर क्लिक करा.
त्यानंतर स्क्रीनवर एक मेनू उघडेल त्या ऑप्शनवर क्लिक करा.
Avoid Tolls आणि Avoid Motorways ऑप्शन ऑन करा.
यानंतर गुगल मॅप तुम्हाला तेच मार्ग दाखवेल ज्यावर टोल आकारला जाणार नाही.