'या' 6 लोकांनी आवळा चुकूनही खाऊ नये, फायद्याऐवजी होईल नुकसान

Nov 19,2023


आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. हे फळं आम्लता वाढण्याचं काम करतं. त्यामुळे हायपर अॅसिडिटी असणाऱ्या लोकांसाठी आवळ्याच सेवन हानिकारक ठरतं. या लोकांनी चुकूनही रिकाम्या पोटी आवळा खाऊ नये.


आवळ्यामध्ये अँटीप्लेटलेट गुणधर्म असून रक्ताच्या गुठळ्या तयार होण्यास प्रतिबंध करु शकतात. त्यामुळे हृदयविकारचा झटका आणि पक्षाघाताचा धोका कमी करण्यास मदत होते. मात्र तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या रक्त विकार असेल तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आवळा खाऊ नये.


जर तुमची कुठल्या प्रकारची शस्त्रक्रिया असेल तर त्यांनी आवळा खाणं टाळावं. या लोकांनी आवळाचं सेवन जास्त प्रमाणात केलं तर रक्तस्त्राव होण्याची भीती असते. त्यामुळे डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय याचं सेवन करु नका.


आवळाचं सेवन केल्यास रक्ताताली साखरेची पातळी कमी करते. टाइप 1 आणि टाइप 2 मधुमेह असलेल्या लोकांसाठी आवळा हा फायदेशीर आहे. मात्र ज्या लोकांची रक्तातील साखरेची पातळी अनेकदा कमी राहतं अशासाठी आवळाचं सेवन धोकादायक आहे.


आवळा जास्त प्रमाणात खाल्ल्यास पोट खराब होऊ शकतं. डारिया आणि डिहायड्रेशन सारख्या समस्या देखील होऊ शकतात. त्यामुळे गर्भवती किंवा स्तनपान करणाऱ्या महिलांनी आवळ्याचं सेवन टाळावं.


जर तुमची टाळू कोरडी किंवा त्वचा कोरडी असेल तर या लोकांनी आवळा जास्त खाल्ल्याने ही समस्या वाढू शकते. त्यामुळे केस गळणं , खाज येणे, कोंडा होणे आणि केसांशी संबंधित इतर समस्या उद्भवू शकतात. आवळ्यातील काही घटक डिहायड्रेशन वाढतात. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

VIEW ALL

Read Next Story