सतत वापरुन जळालेला व करपलेला तवा अगदी काही मिनिटांत लख्ख स्वच्छ करता येईल.
घरातीलच काही पदार्थ वापरुन व अजिबात मेहनत न घेता तुम्ही तव्याचा काळपट थर काढू शकता.
तव्यावर साचून राहिलेले तेलाचे चिकट डाग कधीकधी खूप मेहनत घेतली तरी निघत नाहीत. तवा स्वच्छ करण्यासाठी आम्ही तुम्हाला काही सोप्या ट्रिक्स सांगणार आहोत.
करपलेला व चिकट झालेला तवा साफ करण्यासाठी एका भांड्यात पाणी उकळण्यासाठी ठेवा. त्यात थोड्यावेळाने मीठ देखील टाका
आता या पाण्यात लिंबाचा रस मिसळा आणि हे पाणी तव्यावर टाकून काही वेळ तसच ठेवून द्या. नंतर, तारेने तवा घासायला सुरुवात करा हळहळू सगळी घाण निघून जाईल.
एका मोठ्या ताटात 3-4 ग्लास पाणी टाकून त्यात आर्धी वाटी बेकिंग सोडा आणि व्हिनेगर मिसळा. आता या थाळीत तवा ठेवून द्या.
5-10 मिनिटे असंच ठेवून दिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तव्यावर साचलेला काळा थर व तेलाचे डाग हळूहळू कमी होत आहेत आणि तवा नव्यासारखा लख्ख चमकतोय.