गरमगरम चहाचा पहिला घोट घेतल्याशिवाय अनेकांच्या दिवसाची सुरुवात होत नाही. चहामुळे ताजंतवानं वाटतं, पण ही तुमच्या आरोग्यास मात्र धोकादायक ठरू शकते.
सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने ब्लोटिंग किंवा अॅसेडिटिचा त्रास होऊ शकतो. याशिवाय तुमच्या पचनशक्तीवरही याचा परिणाम होऊ शकतो.
रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने त्याचा त्यांच्या मानसिक स्वास्थावर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ही सवय आजच बदलण्याची गरज आहे.
अनेकजण झोप उडवण्यासाठी चहा पितात, पण असं करणं चुकीचं आहे, यामुळे तुमच्या झोपच्या वेळेवर परिणाम होऊ शकतात.
रिकाम्यापोटी चहा पिण्याचा सर्वात मोठा धोका म्हणजे रक्तदाब वाढू शकतो आणि यामुळे ह्रदयविकारासारखी समस्या उद्भवू शकते.
सकाळी शक्यतो रिकाम्या पोटी दुधाचा चहा पिणं टाळा. त्यामुळे डिहाइड्रेशनसारखी समस्या निर्माण होऊन शरीरात पाण्याची कमी जाणवू शकते.
ही सवय डोकेदुखीचं कारणही ठरू शकतं. सकाळी झोपेतून उठल्यार काहीतरी हलका पदार्थ खाऊन त्यानंतर चहा प्यावा असं तज्ज्ञ सुचवतात.