जेवणासोबत खा ही गोड-आंबट चटणी, जेवणाला येईल आणखी चव
शेंगदाण्याची चटणी सगळेच खातात असं नाही. पण जर तिला थोड्या वेगळ्या पद्धतीनं बनवलं तर तुम्हालाही नक्कीच आवडेल.
शेंगदाणे, हिरवी मिर्ची, अदरक, लिंबू, जीर, तेल आणि पुदीना या सगळ्या गोष्टींची गरज लागते.
पॅनमध्ये थोडं तेल घाला आणि हिरवी मिर्ची, शेंगदाणे आणि जीरं घालून फ्राय करा.
त्यानंतर या सगळ्यात आलं आणि मीठ घालून पेस्ट तयार करा.
पेस्ट केल्यानंतर त्यात लिंबूचा रस घाला आणि जेवणाच्या वेळी ताटाला लावा.