खव्यापासून तयार केला जाणारा रसगुल्ला हा अनेकांच्याच आवडीचा गोडाचा पदार्थ.
साखरेच्या रसात डुंबलेला पांढराशुभ्र रसगुल्ला पटकन खाणारी कैक मंडळी हा पदार्थ समोर आला की त्यावर ताव मारतात.
रसगुल्ला तयार करण्यासाठी साखरेचा मोठ्या प्रमाणात वापर होत असून, साखर आरोग्यासाठी मात्र पूरक नाही ही बाब इथं विसरून चालणार नाही.
रसगुल्ल्याच्या अति सेवनामुळं स्थुलता वाढण्यास वाव मिळतो. मधुमेहाचा त्रास सतावणाऱ्यांसाठी रसगुल्ला खाणं वर्ज्यच आहे.
प्रमाणाबाहेर रसगुल्ला खाल्ल्यास नसांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा होऊन यामुळं हृदयविकारांचा धोका बळावतो.
रसगुल्ला अधिक प्रमाणात खाल्ल्यास त्यामुळं उच्च रक्तदाबाची समस्या डोकं वर काढते. त्यामुळं कितीही आवडत असला तरीही एकतर रसगुल्ला खाणं टाळा किंवा आवडीला आळा घाला. (वरील माहिती उपलब्ध संदर्भांवर आधारित असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)