झोपेत तुमचीही लाळ गळते का? हा धोक्याचा इशारा तर नाही? जाणून घ्या याचा नेमका अर्थ काय

Swapnil Ghangale
Dec 27,2024

लाळ गळण्याची समस्या

आपल्यापैकी अनेकांना झोपेत लाळ गळण्याची समस्या असते. अर्थात याबद्दल उघडपणे कोणी बोलत नाही तरीही ही समस्या अनेकांना भेडसावते.

बदलांचा इशारा?

अशी लाळ का गळते? शरीरामधील कोणत्या बदलांचा हा इशारा असतो जाणून घेऊयात सविस्तरपणे...

गॅस निर्माण झाला तर...

पोटात जास्त गॅस निर्माण झाला तर झोपेत लाळ गळण्याची समस्या निर्माण होते.

सायनस

श्वसननलिकेमध्ये संसर्ग असेल तर लाळ गळण्याची समस्या निर्माण होऊ शकते.

झोपेत तोंडावाटे श्वास घेताना...

सर्दी झाली असेल तर अनेकजण झोपेत तोंडावाटे श्वास घेतात. अशावेळेस तोंडातून लाळ गळू शकते.

टॉन्सील

टॉन्सीलमुळे घशाला सूज आल्याने तोंड उघडं राहून लाळ गळते.

भीती

एकट्याने झोपण्याचे भीती वाटत असेल तर त्यामुळेही झोपेत लाळ गळण्याची समस्या निर्माण होते.

...तर लाळ गळते

झोपेसंदर्भातील समस्यांमध्ये झोपेत बडबडणे किंवा चालण्याची समस्या असेल तर लाळ गळते.

चुकीच्या पद्धतीने झोपणे

झोपताना चुकीच्या पद्धतीने झोपल्यानेही लाळ गळण्याची समस्या निर्माण होतो.

एलर्जी

काही औषधं किंवा पदार्थांची एलर्जी असेल तर सतत लाळ गळण्याची समस्या निर्माण होऊ शकते.

तुळशीची पानं चावून खा

दिवसातून तीन ते चार तुळशीची पानं चावून खावीत आणि पाणी प्यायलाने लाळ गळण्याची समस्या कमी होते.

दालचीनी असलेला चहा

दालचीनी असलेला चहा प्यायल्यानेही लाळ गळण्याची समस्या दूर होते.

असे पदार्थ टाळा

पचनासाठी जास्त वेळ लागणारे पदार्थ टाळल्यासही लाळ गळण्याची समस्या कमी होते.

वैद्यकीय सल्ला घ्या

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story