हिरवी मिरची जास्त खाताय? जाणून घ्या त्याचे दुष्परिणाम

Aug 05,2024

हिरवी मिरची

हिरवी मिरची हा भारतीय जेवणातील एक असा घटक आहे, ज्याशिवाय अन्न अपूर्ण वाटते.

अन्नात हिरवी मिरची

भाज्या आणि डाळींसोबतच सॅलडमध्ये हिरवी मिरचीही खाल्ली जाते. अनेकजण चवीसाठी जेवण करताना दोन-तीन हिरव्या मिरच्या खातात.

हिरवी मिरची जास्त खाल्ल्याने

जर तुम्ही हिरवी मिरची लाल मिरचीपेक्षा आरोग्यदायी आहे असं समजून जास्त प्रमाणात वापरत असाल तर त्यामुळे अनेक नुकसान होऊ शकतात.

पोटाच्या समस्या

जास्त प्रमाणात हिरवी मिरची खाल्ल्यास ॲसिडिटी, जळजळ आणि पोटदुखी यांसारख्या समस्या होऊ शकतात.

झोपेशी संबंधित समस्या

हिरवी मिरची खाल्ल्याने आपल्या पेशींना चालना मिळते. तसंच रात्रीच्या जेवणात जास्त प्रमाणात हिरवी मिरची खाल्ल्याने झोपेचाही त्रास होऊ शकतो.

तोंडांची समस्या

हिरवी मिरची फायदेशीर आहे, परंतु ती जास्त प्रमाणात खाल्ल्याने तोंडावर फोड येऊ शकतात.

संसर्गजन्य रोग

हिरवी मिरची खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्तीवर वाईट परिणाम होतो, ज्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो.

या आजारांमध्ये हिरवी मिरची खाऊ नये

मुळव्याध किंवा मधुमेहाच्या रुग्णांनी चुकूनही जास्त हिरवी मिरची खाऊ नये. त्यामुळे त्यांचा आजार आणखी वाढू शकतो.

VIEW ALL

Read Next Story