नियमित फ्रोझन मटार खाल्ल्याने उद्भवू शकतात 'या' 5 समस्या

Jul 25,2024


आपण बऱ्याचवेळा बाजारातून गोठवलेले मटार वापरतो. गोठवलेले मटार संतुलित प्रमाणात न खाल्ल्याने बऱ्याच समस्या उद्भवू शकतात.


बाजारात सहजपणे उपलब्ध असलेले फ्रोझन मटार हे ताज्या मटार एवढे चविष्ट नसले तरी असंख्य लोकांच्या पसंतीस उतरले आहेत . अस मटार जर तुम्ही रोज खात असाल तर या 5 समस्या तुमच्यासाठी निर्माण होऊ शकतात.

वजन वाढणे

फ्रोझन मटारमध्ये भरपूर प्रमाणात कॅलरीज आणि कार्बोहायड्रेट्स असतात. ज्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने तुमचे वजन वाढू शकते.

रक्तातील साखर वाढणे

फ्रोझन मटारमध्ये असलेले स्टार्च शरीरात ग्लुकोजचे प्रमाण वाढवते.यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. मधुमेह असलेल्या रूग्णांनी फ्रोझन मटारचे सेवन कमी करावे.

पचन समस्या

फ्रोझन मटारमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे गॅस , पोटदुखी यांसारखे आजार होऊ शकतात.

एलर्जी

फ्रोझन मटारचे अतिप्रमाणात सेवन केल्याने एलर्जीच्या समस्या होऊ शकतात.यामध्ये तोंडात खाज येणे, पोटदुखी,श्वास घेण्यास त्रास होणे यांसारखी लक्षणे दिसून येतात.

कमी पोषक तत्व

फ्रोझन मटारवर प्रक्रिया करत असताना त्यामध्ये असलेले पोषक घटक कमी होतात. म्हणून फ्रोझन मटारमध्ये ताज्या मटारपेक्षा कमी पोषक तत्व असतात. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story