कोरियन मुलींच्या पातळ कंबरेचं रहस्य उघड; तुम्ही पण दिसाल आता स्लिम आणि ट्रिम
आजकाल सर्वच मुलींना स्लिम आणि ट्रिम दिसायचं असतं.
बॉलिवूडमधील अभिनेत्रींना पाहून आजच्या तरुण मुलींना झिरो फिगरचं वेड लागलंय.
कोरियन सीरीज आणि चित्रपट भारतामध्ये प्रसिद्ध झालं. त्यानंतर त्यांचं सौंदर्य आणि फिगरची जोरदार चर्चा सुरु झाली.
कोरियन अभिनेत्री आणि तिथल्या मुलींचं फिटनेस हे आज जगभरातील मुलींसाठी प्रेरणास्थान आहे.
कोरियन महिलांच्या फिटनेसचं रहस्य समोर आलंय.
कोरियन महिला स्लिम, ट्रिम आणि सौंदर्यासाठी संतुलित आहार घेतात. त्या आहारात प्रथिने, फायबर, कार्ब्स आणि फॅट घेतात.
त्यांचा आहारात भरपूर हिरव्या भाज्या असतात.
कोरियन लोकांच्या तंदुरुस्तीमागे अजून एक गोष्ट म्हणजे आंबवलेले अन्नपदार्थ. आंबवलेले अन्न वजन कमी करण्यासाठी आणि पचनसंस्था सुधारण्यासाठी फायदेशीर मानले जाते.
प्रथिने आणि ओमेगा -3 फॅटी एॅसिडचा चांगला स्त्रोतसाठी ते सी फूड खातात.
बाहेरील जंक फूडऐवजी ही लोक घरातील अन्न पदार्थ खातात.