आचार्य चाणक्य यांच्यानुसार खाण्यापिण्याच्या बाबतीत कधीच संकोच बाळगू नये.
अर्धवट जेवल्यानं आणि पोट न भरल्यानं अनेकदा आकलनक्षमता आणि विचारशक्ती योग्य रितीनं काम करत नाही.
इतरांकडून स्वत:चे पैसे मागण्यास संकोच बाळगलात तर, कायम तुम्ही आर्थिक अडचणींचा सामना कराल.
आचार्य चाणक्य यांच्या सांगण्यानुसार कोणत्याही व्यक्तीनं आपल्या मनातील गोष्ट व्यक्त करण्यापासून संकोच बाळगू नये.
आचार्य चाणक्यांच्या शिकवणीनुसार कायम नव्या गोष्टी शिकण्याला प्राधान्य द्यावं, संकोच बाळगू नये.
जेव्हाजेव्हा एखादी गोष्ट शिकण्यास संकोच बाळगला जातो तेव्हा जीवनात पुढे जाणं आव्हानात्मक होतं. (वरील माहिती उपलब्ध संदर्भांच्या आधारे घेण्यात आली असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)