विमानात प्रवास करताना अनेक नियम असतात. प्रवासादरम्यान तुम्ही कोणत्या गोष्टी घेऊन जायच्या आणि किती प्रमाणात घेऊन याबद्दल अनेक नियम आहेत.
जर तुम्ही पहिल्यांदा विमानातून प्रवास करत असाल तर या महत्वाच्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
विमानातून प्रवास करताना तुम्ही तुमच्या सोबत किती रक्कम घेऊन जाऊ शकता या बद्दल आज जाणून घेऊया.
RBI च्या नियमावली नुसार तुम्ही डोमेस्टीक विमानात प्रवास करताना 2 लाख रुपये घेऊन जाऊ शकता.
पण जर तुम्ही इंटरनॅशनल विमानामध्ये प्रवास करत असाल तर यासाठी वेगळी नियामवली आहे.
नेपाळ, भुतान या देशांव्यतिरीक्त तुम्ही अन्य देशांत 3 हजार डॉलर घेऊन जाऊ शकता.
जर तुम्हाला 3 हजार डॉलर पेक्षा अधिक रक्कम घेऊन प्रवास करायचा असेल तर तुम्ही स्टोर व्हॅल्यू कार्ड ट्रॅवल चेक, बॅंकर्स ड्राफ्ट यांसारख्या पर्यायाचा वापर करु शकता.
भारतात विदेशी प्रवाशांना रक्कमेबाबत कोणतही बंधन नसतं. फक्त 10 हजार डॉलर्सहुन जास्त रक्कम आणल्यास करन्सी डिक्लेरेशन फॉर्म भरावा लागतो.
(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)