रतन टाटा यांना कोणत्याही परिचयाची गरज नाही. टाटा समुहाचे माजी चेअरमन कायमच आपल्या कामामुळे आणि खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहतात.
रतन टाटा यांचं मुंबईतील अतिशय आलिशान परिसरात म्हणजे कुलाबा येथे घर आहे. महत्त्वाचं म्हणजे हा मुंबईतील सर्वात महागडा परिसर आहे.
निवृत्तीनंतर रतन टाटा आपलं आयुष्य या घरात घालवत आहेत. रतन टाटा यांचं घर हे त्यांच्या साधेपणाचं लक्षण आहे.
रतन टाटा यांचे मुंबईत सी फेसिंग घर आहे. जे कुलाब्यातील अतिशय आलिशान घर आहे.
रतन टाटा यांच्या आलिशान घरात एकाचवेळी 50 लोकं राहू शकतात. महत्त्वाचं म्हणजे कार पार्किंगमध्ये एकाचवेळी 15 कार पार्क करु शकतात.
या आलिशान घराच्या टॉप फ्लोअरवरती इन्फिनिटी पूल, प्रशस्त बार आणि बार्बेक्यू झोन आहे.
तसेच या घरात आर्ट मीडिया रुम, लायब्ररी, जिम आहे. यामध्ये सर्वात उत्तम टेक्नॉलॉजी पाहायला मिळत आहे.
रतन टाटा कायमच सोशल मीडियापासून दूर असतात. त्यांनी या घराला देखील तसंच सगळ्यापासून अलिप्त ठेवलं आहे.
13 हजार स्क्वेअर फुटावर हे आलिशान घर पसरलं असून 7 भागांमध्ये ते विभागलं आहे.