घरच्या घरी वेलची कशी उगवायची?
अनेकजण या वेलचीचा वापर मुखवास म्हणून करतात, काहीजण चहाला छान चव आणण्यासाठी वेलची वापरतात.
बिर्याणीपासून अगदी गोडाच्या पदार्थांमध्येही सुवासिक गुणांमुळं वेलचीचा वापर केला जातो. हीच वेलची घरात उगवता आली तर?
वेलचीचं रोप घरातही उगवणं शक्य आहे, पण त्यासाठी सुकलेली वेलची फायद्याची नसून, रोपवाटिकेतून तुम्ही तिच्या बिया आणणं गरजेचं आहे.
वेलचीच्या या बिया लावण्यापूर्वी त्या पाण्यामध्ये भिजवून घ्या आणि एका कुंडीमध्ये लाल- काळी माती एकत्र करा.
आता वेलचीच्या बिया मातीमध्ये रोवून त्यावर थोडं पाणी शिंपडा. नारळाचं खत अर्थात कोकोपीटही मातीत मिसळा.
साधारण 4 ते 6 दिवसांमध्ये वेलचीच्या बी ला अंकुर फुटेल. यानंतर या अंकुराला थोडंथोडं पाणी द्या. हळुहळू वेलचीचं हे रोप मोठं होत जाईल.